अल्पसंख्याक हक्क दिन; स्वतःच्या हक्क रक्षणासाठी जागरुकतेने पुढे या प्र.जिल्हाधिकारी संजय खडसे यांचे आवाहन







 अकोला, दि.18 (जिमाका)- अल्पसंख्याकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक असले पाहिजे. मात्र स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तसेच आयुष्यात स्वतःला हवं ते मिळविण्यासाठी स्वतः जागरुक होऊन प्रत्येकाने पुढे यावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्र. जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज येथे केले.

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने  ‘अल्पसंख्याक यांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव  या विषयावर चर्चेसत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात करण्यात आले होते.

या कार्याक्रमाला उपविभागीय अधिकारी निलेश अपार, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर,  अधीक्षक मिरा पागोरे, सहा.अधिक्षक अतुल सोनवणे, शैक्षणिक गुणवंता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, जेष्ठ विधीज्ञ ॲड. मोहम्मद डोकाडिया, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष पी.जे. वानखडे, रेड क्रॉस सोसायटीचे प्रभाजीत सिंग बछेरे, अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव अलीम देशमुख, समुदायातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात प्र. जिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, सर्व अल्पसंख्याक समुदाय आपल्या हक्कांबाबत जागरुक राहून आपले हक्क स्वतः मिळवू लागतील, अशा तऱ्हेने मुख्य प्रवाहात सामिल होतील त्यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. तसेच शासनाव्दारे अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राबवित असलेल्या योजना प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचेल याकरीता प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेल्या विद्याथी-विद्यार्थिनी शासनाच्या विविध योजना, निकष व अंमलबजावणीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नाचे निराकरण प्र.जिल्हाधिकारी यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने करुन दिल्या.

सहभागी वक्त्यांनी  अल्पसंख्याक समुदायांच्या विकासासाठी शासनाने तयार केलेल्या योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याबाबत प्रशासनाने तसेच अल्पसंख्याक समुदायातील सर्व घटकांनी मिळून प्रयत्न करावे. तसेच अल्पसंख्याकांनी आपले अधिकार जाणून आपला विकास व देशाप्रती कर्तव्य पुर्ण करावेत, असे मत मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  शैक्षणिक गुणवंता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ