समता पर्वनिमित्त गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात विविध उपक्रम


अकोला,दि. 7(जिमाका)-: राज्यात 26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरीनिर्वाणदिन’ 6 डिसेंबर या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे  झाले आहे. याचाच एक भाग म्हणून  सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत येथील गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात समता पर्वांतर्गत दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये उद्देशिका वाचन, विद्यार्थ्यांचे मोटिव्हेशन कार्यक्रम, मार्गदर्शन कार्यशाळा, विद्यार्थ्यांकडून 18 तास अभ्यास, वसतीगृहात सामुहिक स्वच्छता इत्यादी उपक्रम राबविण्यात आले, अशी माहिती गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल  एस.एस. लव्हाळे यांनी दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ