ग्रंथोत्सव २०२२: ग्रंथोत्सवाच्या उपक्रमाने मिळेल वाचनसंस्कृतीला चालना; समारोप सत्रात आ. किरण सरनाईक यांचे प्रतिपादन

 





अकोला,दि.११ (जिमाका)-  ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमाने ग्रंथांच्या आणि वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित होऊन वाचनसंस्कृतीला चालना मिळेल, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आ. ॲड. किरण सरनाईक  यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवाच्या समारोप सत्रात आ. किरण सरनाईक यांनी उपस्थिती दिली. त्यांच्या हस्ते उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी मनोज वानखडे व त्यांचे सहकारी कैलास गव्हाळे यांना सन्मानित करण्यात आले. समारोप सत्रास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथमित्र एस.आर.बाहेती आणि बाबुजी देशमुख सार्वजनिक वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती अरविंद ढोणे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा कोकाटे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

१ लाख ४८ हजार ६०५ रुपयांची ग्रंथविक्री

ग्रंथोत्सवात एकूण १४ पुस्तक विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले होते.  या स्टॉल्सवर गेल्या दोन दिवसांत एकूण २४४६ पुस्तके ग्रंथप्रेमींनी खरेदी केली. त्यातून  १ लाख ४८ हजार ६०५ रुपयांची उलाढाल या ग्रंथोत्सवात झाली अशी माहिती कैलास गव्हाळे यांनी दिली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ