जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना



 

            अकोला दि.26(जिमाका)-  सर्वसामान्य जनतेचे अर्ज, निवेदने व शासन स्तरावर असलेली कामे पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुखता आणण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांनी मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहलेले अर्ज, निवेदने इ. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे  सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची रचना

जिल्हास्तर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तात्पुरत्या स्वरुपात निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सुरु करण्यात आले आहे. या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी तर नायब तहसिलदार व एक लिपीक टंकलेखक कार्यरत असेल.  

या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेकडून  मा.मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इ. स्विकारले जाईल. प्राप्त अर्ज, निवेदनावर जिल्हास्तरावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेऊन प्रकरणे तातडीने निकाली काढले जाईल. तसेच ज्या प्रकरणाची शासन स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे, असे वैयक्तीक किंवा धोरणात्मक अर्ज, संदर्भ, निवेदने मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथे पाठविण्यात येईल, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ