ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक: मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू


 अकोला, दि.19 (जिमाका)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतीचे मतदान रविवार दि. 18 रोजी पार पडले असून मतमोजणी मंगळवार दि. 20 रोजी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्र. जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात म्हटल्याप्रमाणे :

  1. ग्रापपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्‍यापासून निवडणूकीची प्रक्रिया संपेपर्यंत शस्‍त्र परवानाधारकास शस्‍त्र वाहून नेण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. जो कोणी या नियमांचे उल्‍लंघन करील तो इसम तथा शस्‍त्र परवानाधारक दंडनीय कार्यवाहीस पात्र ठरेल.
  2. ज्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्‍या मतदान केंद्राच्‍या ठिकाणपासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर ईलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्‍या कामा‍व्‍यतिरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षांचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्‍यतिरिक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे.
  3. ज्‍या ठिकाणी निवडणूक साहित्‍य कक्ष (STRONG ROOM) आहेत, तसेच ज्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशा ठिकाणी 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू राहतील.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ