कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘सहा’ पॉझिटिव्ह; दोन डिस्चार्ज


अकोला दि.24(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 70 अहवाल प्राप्त झाले. त्यात सहा जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 6 व खाजगी 0)6+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 6.

आरटीपीसीआर ‘सहा’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात तीन महिला व तीन  पुरषांचा समावेश असून हे मुर्तिजापूर येथील दोन तर अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोन डिस्चार्ज

आज दिवसभरात दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘11’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66091(49958+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ