अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वक्तृत्व स्पर्धा





अकोला दि.21(जिमाका)- महाराष्ट्र माईनॉरिटी एनजीओ फोरम व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आज  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होवून अल्पसंख्याक हक्काबाबत आपले विचार मांडले.

            अल्पसंख्याक विकास विभागाच्या सूचनेनुसार अल्पसंख्याकांना आपल्या अधिकारांबाबत जाणीव व जागृती निर्माण व्हावी याकरीता जिल्ह्यात विविध स्पर्धा व कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, शैक्षणिक गुणवंत विभागाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, बाळापूर तहसिलदार सयद असान्नोदिन, सहायक अधिक्षक अतुल सोनवणे, माईनॉरिटी फोरमचे प्रा.रफीक, डॉ. जुबेर नदीम, मोहसीन अमीन, परवेज अखतर, डॉ. मुजाहीत अहमद आदि उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिर्जा खादील रजा यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा समन्वयक गजानन महल्ले यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ