मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा; शाळा महाविद्यालयांनी उत्स्फुर्तने सहभागी व्हा




अकोला,दि.29(जिमाका)-  मराठी भाषा विभागाव्दारे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये दि. 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व शाळा व महाविद्यालयानी मराठी भाषा संवर्धनासाठी पंधरवाडा कालावधीत विविध कार्यक्रमाचे नियोजन करुन पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी उत्स्फुर्तने सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकशाही सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक प्रा. येऊले, शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम