शनिवारी (दि.१०)शालेय पक्षीमित्र संमेलन

 


अकोला,दि.८ (जिमाका)-  शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षी निरीक्षण या छंदाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी व त्या माध्यमातून पक्षी आणि पर्यावरण संर्वधनाची दिशा दाखविण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला, निसर्गकट्टा, अकोला वन विभाग व महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १०  रोजी सकाळी ८ ते ४ यावेळेत माऊंट कारमेल हायस्कुल हॉल, स्टेशन रोड, अकोला येथे ७ व्या शालेय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्षीमित्र संमेलनानिमित्त निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा  घेण्यात आल्या आहे. या संमेलनअध्यक्षांची निवड निबंध स्पर्धेतून करण्यात येते. सर्वोत्कृष्ट निबंध लिहीणाऱ्या विद्यार्थ्याला संमेलनाच्या अध्यक्षाचा मान दिला जातो. या निबंध स्पर्धेत उत्कृष्ट निबंध लिहीणाऱ्या कु. चैताली रामनाथ बाळ, विवेकानंद कॉन्व्हेंट, अकोला या विद्यार्थिनीची संमेलन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. द्वितीय क्रमांक सुमित निकम , नँशनल मिलीटरी स्कुल,गायगांव , तृतीय क्रमांक अर्थव अजय पाटील, प्रभात किड्स व उत्तेजनार्थ  पारितोषिक कु. निधी जाधव, जे. आर.डी. टाटा अड्युलँब अकोला व शिवगंध जोत, नरसिंग विद्यालय अकोट यांना मिळाले आहे.

या संमेलनात विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद व निसर्ग संवर्धन या विषयावर मार्गदर्शन पक्षीमित्र कौस्तुभ पांढरीपांडे कारंजा, अनिल मनवर, अकोला, महाराष्ट्र पक्षीमित्र चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर व अमोल सावंत हे करणार आहे. जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांना या संमेलनात सहभागी होता आले पाहीजे या अनुषंगाने हे संमेलन २ सत्रात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात पक्षी सप्ताह निमित्त आयोजित पत्र लेखन स्पर्धेत विजयी स्पर्धकांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये अकोला तालुका प्रथम क्रमांक कु. गौरी रविंद्र इचे (मोहरीदेवी खंडेलवाल ) द्वितीय क्रमांक सानिका राजू चव्हाण (खंडेलवाल इंग्लीश स्कुल) तृतीय क्रमांक  स्नेहल सुरेंद्र शिराळ (राजेश्वर कॉन्व्हेंट)

अकोट तालुका प्रथम क्र. स्नेहा प्रमोद खांडवाये (श्री नरसींग विद्यालय, अकोट, द्वितीय क्रमांक गौरी दिपक पातोंड (महात्मा गांधी विद्यालय, गांधीग्राम, तृतीय क्रमांक रिद्धी पंजाबी (लक्ष्मीबाई गणगणे विदयालय, अकोट ), मुर्तीजापूर तालुका प्रथम क्रमांक कु. उर्वशी मनिष संघवी ( श्रीमती सरला राम काकाणी एज्युकेशन अँकॅडमी, मूर्तिजापूर), पातूर तालुका : प्रथम क्रमांक.कु. आरती संजय काठोळे (बाबासाहेब नाईक, सावरगांव द्वितीय क्रमांक सैय्यद खेनम सैय्यद रऊफ (शाहबाबू उर्दू, पातूर) तृतीय क्रमांक पवन घुगे (सिद्धार्थ विहार, पातूर),बाळापूर तालुका : प्रथम क्रमांक : अथर्व संतोष मोकळकर (नॅशनल मिलीटरी स्कूल गायगांव,द्वितीय क्रमांक : प्रेरणा सुनिल शेगोकार (शिवशंकर विद्यालय, उरळ),तेल्हारा तालुका जान्हवी नीलेश देशमुख ( स्व. राजीव . गांधी विद्यालय, तळेगांव बाजार) यांचा समावेश आहे.

या संमेलनात जास्तीत जास्त निसर्गप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी  सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद अकोला डॉ.सुचिता पाटेकर यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ