ग्रंथोत्सव २०२२: एकपात्री प्रयोग, हास्य कवितांनी गाजवली दुपार
अकोला,दि.११ (जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात ‘मी वाचनसंस्कृती बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग व ‘अडम धडम’ या हास्यकवितांच्या कार्यक्रमाने दुपार गाजवली.
ग्रंथोत्सवाच्या दुपारच्या सत्रात ‘मी वाचन संस्कृती बोलते’ हा एकपात्री प्रयोग
हर्षदा इंदाने या अकोटच्या विद्यार्थिनीने सादर केला. या प्रयोगातून वाचनसंस्कृतीच्या
योगदानातून घडलेल्या महान व्यक्तिमत्वांची मनोगते या विद्यार्थिनीने आपल्या अभिनयातून
साकारली. तिच्या प्रत्येक प्रवेशाला प्रेक्षकांची दाद मिळाली. त्यानंतर ‘अडम धडम’ हे हास्य कविसंमेलन पार पडले. या
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हास्य कवि राजाभाऊ देशमुख हे होते. त्यात धीरज चावरे,
प्रशांत वरईकर, हिम्मत ढाळे, देवलाल तायडे या हास्यकविंनी आपल्या रचना सादर करुन
उपस्थितांना मनमुराद हसविले. या सत्राचे सुत्रसंचालन हिम्मत ढाळे यांनी केले.
०००००



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा