राष्ट्रीय पशुधन अभियानातंर्गत अहिल्या शेळी योजना; अनुसूचित जाती, जमाती लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित


अकोला दि.19(जिमाका)- राष्ट्रीय पशुधन अभियान व ग्रामीण परसबाग शेळी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जाती,जमाती व अल्पभूधारक लाभार्थ्यांकडून अहिल्या शेळी योजनेकरीता रविवार दि. 25 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले आहे. इच्छुक पात्रताधारक लाभार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन सादर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे मार्फत शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पुशधन अभियांनातर्गंत अहिल्या शेळी योजना राबविले जातात. ही योजना वयवर्ष 18 ते 60 वर्षामधील अनुसूचित जाती,जमाती, द्रारिद्र्य रेषेखालील व अल्पभूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यंत भूधारक) लाभार्थ्यांकरीता असून महिला लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जातात. या योजनेची माहिती व कार्यपद्धती www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन करणे आवश्यक असून www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर तसेच ॲन्ड्राईड मोबाईलव्दारे अहिल्या योजना ॲपवर नोंदणी करता येईल, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे व्यवस्थापकीय संचालक शंशाक कांबळे यांनी दिली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ