औद्योगिक प्रशिक्षण संस्थाला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली भेट






अकोला,दि.24(जिमाका)- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला(मुलींची) जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुकवारी (दि.23) रोजी भेट दिली. भेटी दरम्यान संस्थेच्या विविध व्यवसाय व संस्थेअंतर्गत चालणाऱ्या विविध व्यवसायामध्ये अंतर्भूत असलेल्या कौशल्याची माहिती जाणून घेतली.

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हा स्तरातून प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल शिल्पनिदेशक तथा मार्गदर्शक अरविंद पोहरकर आणि तंत्रकृतीमध्ये सहभागी सर्व प्रशिक्षणार्थी मुलींचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अभिनंदन करुन कौतूक केले. याप्रसंगी तंत्रकृतीचे अवलोकन सुद्धा केले. तसेच इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायातर्फे तयार करण्यात आलेल्या "कौशल्य वार्ता " या अनियतकालिकाचे अनावरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वाल, कौशल्य व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे (मुलींची) प्राचार्य शरदचंद्र ठोकरे, गटनिदेशिका रेखा रोडगे आदि उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ