मराठी भाषा प्रचार व प्रसारांकरिता आज व्याख्यान


अकोला,दि.6 (जिमाका)-  मराठी भाषा प्रचार व प्रसारकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आज 7 डिसेंबर 2022 रोजी  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठी भाषा संवर्धनासाठी उपाययोजनाबाबत विदर्भ साहीत्य संघाचे गजानन नारे मार्गदर्शक व्याख्यान करणार आहे. तसेच मान्यवरांव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  यावेळी प्र.अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा कौश्यल विकास विभागाचे सहायक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने,  समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदि उपस्थित राहणार आहे.

 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना