पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा :४६९ उमेदवारांचा सहभाग;१७८जणांची प्राथमिक निवड

 







अकोला, दि.८(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात भरती प्रक्रियेसाठी ४६९ उमेदवारांनी सहभाग नोंदविला तर निवडप्रक्रियेनंतर १७८ जणांची प्राथमिक निवड करण्यात आली,अशी माहिती जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.

         जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि  अकोला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात २७२ पदांसाठी भरती  प्रक्रिया राबविण्यात आली.  त्यात प्रमुख सहा आस्थापनांनी  सहभाग घेतला. भरती प्रक्रियेसाठी ४६९ उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात निवडप्रक्रियेनंतर १७८ जणांची  प्राथमिक निवड झाली.

             उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणीच नोंदणीकरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकर, प्रफुल्ल दास तसेच जिल्हा समन्वय शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच जिल्हा रोजगार स्वयंरोजगारव कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ