शालेय पक्षीमित्र संमेलनातून विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाचे धडे


अकोला
,दि.१२(जिमाका)-  जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला, निसर्गकट्टा, अकोला वन विभाग व महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ व्या शालेय पक्षीमित्र संमेलनातून शालेय विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.१०) पक्षी निरीक्षणाचे धडे देण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षी निरीक्षण या छंदाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी व त्या माध्यमातून पक्षी व पर्यावरण संर्वधनाची दिशा दाखविण्यासाठी शनिवारी माऊंट कारमेल हायस्कुल हॉलमध्ये ७ वे शालेय पक्षीमित्र संमेलन पार पडले. सर्वोत्कृष्ट निबंध लिहीणारी विद्यार्थीनी चैताली बाळ हिला संमेलनाच्या अध्यक्षाचा मान मिळाला. माऊंट कारमेलचे प्राचार्य फादर मॅथ्यू करीगल, जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्य) डॉ. सुचिता पाटेकर, पक्षी अभ्यासक कौस्तुभ पांढरीपांडे (कारंजा), अनुल मनवर (अकोला), निसर्गकट्टाचे संस्थापक अमोल सावंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन करुन संमेलनाचे उद्घाटन झाले.त्यानंतर कौस्तुभ पांढरीपांडे यांनी तणमोर पक्ष्यावर तर अनुल मनवर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. डॉ. संतोष सुरडकर यांनी पक्षी निरिक्षण एक अनुभव या विषयावर सादरीकरण केले.

पक्षीमित्र संमेलनानिमित्त निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धेत प्रथम चैताली बाळ, द्वितीय सुमित निकम, तृतीय अर्थव पाटील व उत्तेजनार्थ पारितोषिक निधी जाधव व शिवगंध जोत यांना मिळाले. वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम कु. तनुश्री दाभाले , बाल शिवाजी हायस्कुल, द्वितीय पुर्वा किशोर बळी, प्रभात किड्स, तृतीय तेजस्विनी गुरव धनाबाई विद्यालय बाळापूर, प्रोत्साहन पर आयना आसिमोद्दीन शाहबाबू विद्यालय, पातूर, व अदिती वानखडे खंडेलवाल विद्यालय यांना पारितोषिके मिळाली. पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक जि.प. शाळा, गोपालखेड , द्वितीय क्रमांक राजेश्वर कॉन्व्हेंट , तृतीय क्रमांक सन्मित्र पब्लिक स्कुल व उत्तेजनार्थ यशोदाबाई इंगळे विद्यालय व्याळा यांना मिळाले. वक्तृत्व स्पर्धेसाठी डॉ. स्वाती दामोदरे, डॉ. निशाली पंचगाम व श्रीमती कांचन पटोकार तर पथनाट्य स्पर्धेसाठी डॉ. प्रदीप अवचार व अमोल इंगळे हे परीक्षक म्हणून लाभले होते.

मोबाईल फोटोग्राफी मध्ये सायली अंभोरे प्रथम, सक्षम तायडे द्वितीय व मोहम्मद सोशल मोहम्मद अनिस याला तृतीय क्रमांक मिळाला  उप वनसंरक्षक अर्जुन के. आर, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर व वृक्षप्रेमी विवेक पारसकर, कांचन पटोकार, निसर्गकट्टा चे अध्यक्ष अजिम शेख व महाराष्ट्र पक्षीमित्रचे विदर्भ समन्वयक अमोल सावंत यांच्या  उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. विवेक पारसकर यांना कृतज्ञता पुरस्कार व मंगेश तायडे यांना दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. हिमांशु पाटेकर यांच्या पक्ष्यांच्या फोटोचे टेबल कँलेडरचे प्रकाशन करण्यात आले. सुत्र संचालन संदिप वाघडकर यांनी केले. संमेलनात ४० शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मिलिंद शिरभाते, डॉ. हरिष मालपाणी, अजय फाले, मनोज लेखनार, राहुल ओईंबे, संतोष सहारे, प्रेम अवचार, विजय पवार यांनी परिश्रम घेतले.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ