कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात ‘एक’ पॉझिटिव्ह; चार डिस्चार्ज


अकोला दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 60 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर चार रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.

आरटीपीसीआर ‘एक’ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात  एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलाचा समावेश असून हा रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

चार डिस्चार्ज

आज दिवसभरात चार रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘सहा

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66073(49940+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ