अमरावती विभाग पदविधर निवडणूक कार्यक्रम घोषीत; 30 जानेवारीला मतदान तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी



 अकोला, दि.30(जिमाका)-  भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार मतदान सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी तर मतमोजणी गुरुवार दि. 2 फेब्रवारी रोजी होईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र. जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली.

निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे

गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी विधान परिषद सदस्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर करणे. गुरुवार दि. 12 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक.  शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करणे. सोमवार दि. 16 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक. सोमवार दि. 30 जानेवारी रोजी  सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान. गुरुवार दि. 2 फेबुवारी रोजी मतमोजणी व शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे.

पदविधर निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून तात्काळ प्रभावाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहिल, असे प्र.जिल्हाधिकारी सौरभ कटीयार  यांनी पत्राव्दारे कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा