अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी निकाली काढावेत



अकोला,दि.25(जिमाका)-  अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे  महाडिबीटी पोर्टलवरिल मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज ऑटो रिजेक्ट करण्यात आले होते. ऑटो रिजेक्ट अर्ज पुनविचारार्थ मंजुरीसाठी महाविद्यालयाच्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील  सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी पात्र अर्जाची पडताळणी करुन जिल्हा कार्यालयाच्या लॉगीन पाठवावे, असे सूचना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिल्या.

सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य व  अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवरील सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील अर्जाची त्रुटीची पूर्तता करुन जिल्हा कार्यालयाच्या लॉगीनवर तात्काळ पाठवावे.याकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी संबधित विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात कळवून त्रुटीची पूर्तता करुन घ्यावी. अर्जातील त्रुटीची पुर्तता करुन घेण्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहिल. त्यानंतरही महाडिबीटी ॲडमिनकडून अर्ज ऑटो रिजेक्ट झाल्यास व पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी संबधित प्राचार्य यांची राहिल. अशा स्थितीत पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयास कोणत्याही प्रकारचे शिष्यवृत्ती योजनेतर्गंत अनुज्ञेय असलेले शुल्क वसूल करता येणार नाही, असे पत्राव्दारे समाजकल्याण विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ