अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची आज(दि.१३) व उद्या (दि.१४) ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 मुंबई, दि. १२: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व २२ केंद्रावरून 


तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून  मंगळवार दि.१३ व  बुधवार दि.१४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  प्रसारित होईल.

दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी अकोला जिल्हा परिषद विविध योजना राबवित आहे. या योजना राबविण्याची कार्यपद्धती,सोई सुविधा, दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकरण, मार्गदर्शन, प्रोत्साहन अशा विविध विषयांची महत्वपूर्ण माहिती अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. अकोला जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ