समता पर्व : तृतीयपंथी व ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याण विभागाची कार्यशाळा


अकोला,दि. ६ (जिमाका)- समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने समता पर्वांतर्गत येथील नवीन सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथी व ज्येष्ठ  नागरिकांसाठी रविवारी (दि.४ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

           कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक पी. डी. सुसतकर होते. गुणवंत शिक्षक संस्थेच्या संचालिका अरुंधती शिरसाट व जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्री. अंधारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

         महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्राच्या माध्यमातून मान्यता दिली आहे. जेष्ठ नागरीकांच्या हक्कासाठीही कायदेशीररित्या त्यांना बळ देणे असो दुर्बलांच्या हक्कासाठी नेहमी तत्पर राहिले व राहत आहेत, असा सुर सामाजिक न्याय विभागाच्या समता पर्व निमित्त आयोजीत कार्यशाळेत निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजनाने झाली. छत्रपती शाहु महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर स्वागत समारंभ व कार्यशाळेच्या औचित्या विषयी सांगण्यात आले.  समाज कल्याणच्या तृतीयपंथी व जेष्ठ नागरीक कायदा या यांजनेसंबंधी माहिती व लाभाचे स्वरुप तसेच याचे महत्व विषद करण्यात आले. कार्यशाळेत सामाजिक क्षेत्रात काम करित असतांना तृतीयपंथीयाविषयी लोकांच्या अवधारणा व यामुळे त्यांचे जिवनावर होणारा परिणाम याविषय श्रीमती. अरुंधती शिरसाट यांनी विस्तृत विवचण केले. असे उपक्रम नियमित राबवावे,  असेही आवाहन त्यांनी केले.  यावेळी समाज कल्याण विभागांचे सेवा निवृत्त अधिकारी व्ही.एल.पवार, मोहोड गुरुजी, तृतीयपंथी दादाराव, शामाबाई, रणजीत सिंग आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक यु.बी.भटकर यांनी केले. सुत्रसंचालन समतादुतचे मनिष चोटमल यांनी  तर आभार प्रदर्शन श्री. लांडगे  यांनी केले. कार्याक्रमाला  जिल्ह्यातील तृतीयपंथी व जेष्ठ नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना