‘बालकांचे कायदे’, याविषयी मार्गदर्शन

 



अकोला,दि.१२(जिमाका)-  गुरुनानक विद्यालय, सिंधी कॅम्प, येथे महिला व बालविकास विभागांतर्गत  जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला यांच्या वतीने पॉक्सो कायदा, चाईल्ड लाईन १०९८, बालकांचे हक्क अधिकार व कायदे या बाबत शुक्रवारी (दि.९) मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परीविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले. यावेळी  विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या करीता जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका कु.मीरा अहुजा, गीता पंजवानी, श्रीमती पूनम केसवानी, श्रीमती वर्षा नलगे, चेतन कडू, सुरेंद्र हिंदवानी आदी उपस्थित होते. प्रास्तावीक प्रदीप किडिले यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे योगेंद्र खंडारे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ