उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाची मोहिम;विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर येत्या १ जानेवारी २०२३ पासून कारवाई

 अकोला दि.१३(जिमाका)-  दुचाकीवर प्रवास करतांना मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १२९ प्रमाणे दुचाकीधारकांनी योग्य मानकांचे हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात दि.१ जानेवारी २०२३ पासून  विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला मार्फत वेळोवेळी जनजागृती व विशेष तपासणी मोहिम राबवून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मोहिम सुरु झाल्यानंतर दुचाकीधारकांकडून हेल्मेटसाठी प्रतिसाद मिळतो, परंतु त्यानंतर पुन्हा दुचाकीधारक विना हेल्मेट दुचाकीवर प्रवास करतात. अपघात झाल्यास डोक्याला दुखापत होऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. त्यानुषंगाने जिल्ह्यात दि.१ जानेवारी २०२३ पासून पुन्हा ही मोहीम राबविण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ