अल्पसंख्याक दिनानिमित्त विविध उपक्रम



अकोला, दि.15(जिमाका)- अल्पसंख्याक दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र माइनॉरिटी एनजीओ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयस्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता भित्ती पत्र व निबंध स्पर्धा तर अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निबंध लेखन, भितीपत्रक व वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

            अल्पसंख्याक विकास विभागाच्या निर्देशानुसार अल्पसंख्याक हक्क दिवस निमित्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशिर हक्काबाबत जाणिव व्हावी याकरीता अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने शाळा व महाविद्यालय स्तरावर दि. 16 ते 22 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

निबंध लेखन, भितीपत्रक व वक्तृत्व स्पर्धा

 निबंध लेखन स्‍पर्धाः-   स्‍पर्धामध्‍ये विद्यार्थ्यांच्‍या सहभागासाठी दोन गट तयार करण्‍यात आले आहे. गट अ मध्ये इयता 8 ते 10 वी वर्गाच्‍या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर गट ब मध्ये इयत्ता 11 व 12 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी पहिल्या दोन निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांचे निबंध रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत अल्पसंख्याक विकास केंद्र, रोटी बँक सेंटर, सागर बेकरी मोमीनपुरा जवळ, अकोला येथे जमा करावे.  

भितिपत्रक स्‍पर्धाः- स्‍पर्धामध्‍ये विद्यार्थ्यांच्‍या सहभागासाठी दोन गट तयार करण्‍यात आले आहे. गट अ मध्ये इयता 5 ते 7 वी वर्गाच्‍या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर गट ब मध्ये इयत्ता 8 ते 10 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  जिल्ह्यातील सर्व शाळेमध्‍ये भितीपत्रक स्पर्धेचे आयोजन शालेयस्‍तरावर सोमवार दि.19 डिसेंबर रोजी करण्‍यात येईल.  त्‍यानंतर गट (अ) व गट (ब) मधील  प्रथम क्रमांक विजयी  विद्यार्थ्‍यांचे मुळ भितीपत्रक जिल्‍ह्यातील  अंतिम निवड फेरीसाठी दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत अली पब्लिक स्कूल पातूर रोड अकोला येथे प्रदर्शित करण्‍यात येईल.  

वक्तृत्व स्पर्धाः-  वक्तृत्व स्‍पर्धामध्‍ये विद्यार्थ्यांच्‍या सहभागासाठी दोन गट  तयार करण्‍यात आले आहे. गट अ मध्ये इयता 8 ते 10 वी वर्गाच्‍या  विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर गट ब मध्ये इयत्ता 11 व 12 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.         जिल्ह्यातील महाविद्यालय व शालेयस्‍तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मंगळवार दि. 20 डिसेंबर रोजी करण्‍यात येईल. त्‍यांनतर गट (अ) व गट (ब) मधील  पहिल्‍या तीन क्रमांक विजयी विद्यार्थ्‍यांना बक्षीस देण्‍यात येईल. जिल्‍ह्यातील शाळा व महाविद्यालयामध्‍ये आयोजीत झालेल्‍या वक्तृत्व स्पर्धेमध्‍ये विजय झालेल्‍या विद्यार्थ्‍यांची जिल्‍हास्‍तरावर वक्तृत्व स्पर्धेमध्‍ये   अंतीम निवड करण्‍यासाठी बुधवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत के. एम. असगर हुसेन कनिष्‍ठ महाविद्यालय, रतनलाल प्लॉट, अकोला येथे अंतीम निवड स्‍पर्धा आयोजीत केली आहे.

            शाळा व महाविद्यालयस्तरावर झालेल्या निबंध लेखन, भितीपत्रक व वक्तृत्व स्पर्धेतील गट (अ) व (ब)  मधुन पहिल्‍या  तीन विजय झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना आणि  प्रत्येक तालुक्यासाठी एक प्रोत्साहन पारितोषिक हे जिल्‍हास्‍तरावर  गुरुवार दि. 22 डिसेंबर 2022 रोजी जिल्‍हा नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे वितरीत करण्‍यात येईल.  स्पर्धेसंबधित अधिक माहितीसाठी https://flyingcolours.org.in/notice_board.php या संकेतस्थळावर भेट द्यावी.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ