पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; आज होणार 272 पदांसाठी भरती प्रक्रिया


अकोला,दि.7(जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 8 डिसेंबर रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात 272 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी इच्छुक पात्रताधारकांनी  या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार दि.8 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मेळावा होणार आहे.

मेळाव्यात सहभागी उद्योजक याप्रमाणे :

 1. आवास फायनान्स सर्व्हीस साठी रिलेशन ऑफिसर- पात्रता बारावी,पदवीधर व पदवीधारक (18 ते 32 वयोमर्यादा) 20 पदे, रिलेशनशीप मॅनेजर- पात्रता कोणत्याही शाखेची पदवी(21 ते32 वर्यामर्यादा) 20 पदे,

2. टीमलेसे सर्व्हीसेस प्रा.लि. साठी- ट्रेनी इंजिनियर पात्रता-अभियांत्रिकी शाखेची पदवी (21 ते 27 वयोमर्यादा) 50 पदे, हेल्पर पदासाठी पात्रता किमान दहावी (18 ते 32 वयोमर्यादा) 50 पदे,

3. क्यूस कॉर्प लि. साठी सेल्स एक्झिक्युटिव्हकरीता पात्रता-कोणत्याही शाखेची पदवी(21 ते 33 वर्यामर्यादा) 45पदे, सेल्स बँकिंगकरीता पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी(21 ते 32 वर्यामर्यादा) 40 पदे,

4. हिंदुजा लेयलँड प्रायनान्स लि. साठी मार्केटींग एक्झिक्युटीव्ह 10 पदे  व कलेक्शन एक्झिक्युटीव्ह 10 पदे पात्रता-कोणत्याही शाखेची पदवी(21 ते 32 वर्यामर्यादा)

5. निर्माण मल्टीस्टेट को.ऑ.क्रेडीट सोसायटी, अकोलासाठी ब्रॅच एक्झिक्युटीव्ह/क्लार्ककरीता पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी व एमएस-सीआयटी (21 ते 40 वर्यामर्यादा) प्रत्येकी 20 पदे.

6. कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र, वाडेगावसाठी प्रकल्प अधिकारी-पात्रता कृषी पदवीधर 1 पद, भांडारपाल पात्रता-पदविका कृषी किंवा लाईव्हस्टॉक सुपरव्हायझरचे 2 पदे, ॲग्रीकलचर इंजिनियर पात्रता-कृषी अभियांत्रीकी पदवी 1 पद, पशूवैद्य पात्रता-पशूवैद्य पदवी 3 पदे (या सर्व पदाकरीता 21 ते 40 वर्यामर्यादा)

 या प्रमाणे 272 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 व भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ