ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज: 82 टेबलावर होणार मतमोजणी

 

 अकोला दि.19(जिमाका)-  जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 265 ग्रामपंचायतीत मतदान पार पडले असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात मतमोजणी होणार असून 82 टेबलावर 278 कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतमोजणी केल्या जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे दिली आहे.  

82 टेबलावर 278 कर्मचारी करणार मतमोजणी

 शासकीय धान्य गोदाम क्रमांक 1, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे 12 टेबल, तहसिल कार्यालय, तेल्हारा येथ 12 टेबल, नविन शासकीय धान्य गोदाम क्रं. 6, तहसिल कार्यालय परिसर, मुर्तिजापूर येथे 15 टेबल, शासकीय धान्य गोदाम खामगाव नाका, बाळापूर येथे 9 टेबल, खुल सभागृह नविन तहसिल कार्यालय, अकोट येथे 12 टेबल, पंचायत समिती सभागृह, बार्शीटाकळी येथे 12 टेबल तर तहसिल कार्यालय, पातूर येथे 10 टेबल असे एकूण 82 टेबलावर 278 कर्मचाऱ्यांव्दारे मतमोजणी होणार आहे.  

265 ग्रामपंचायतीचे मतमोजणी

जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात ६२ पैकी २३, अकोट-८४ पैकी ३६, मुर्तिजापूर-८६ पैकी ५१, अकोला- ९७ पैकी ५४, बाळापूर ६६ पैकी २६, बार्शी टाकळी- ८० पैकी ४७, पातूर- ५७ पैकी २८ अशा एकूण ५३२ पैकी २६५ ग्रामपंचायतीचे  मतमोजणी होणार आहे , अशी माहिती ग्रामपंचायत निवडणूक कार्यालयाव्दारे देण्यात आली आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ