अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री प्रकरणी व्यापाऱ्यास अटक

  अकोला दि.१३(जिमाका)-      गोरक्षण परिसरातील पान विक्रीच्या दुकानावर छापा टाकून ११ हजार ४३८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला असून दुकान चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन नवलकार यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथीलअन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार गौरक्षण रोड येथे सोमवारी (दि.१२) छापा टाकून प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. मे.ओमकार पान हाउस ॲण्ड डेली निड्स्, गौरक्षण रोड असे या दुकानाचे नाव असून याठिकाणाहून ११ हजार ४३८ रुपये किमतीचा प्रतिबंधीत असलेल्या अन्न पदार्थ सुंगधी तंबाखु (बाबा) व पान मसाला (रजनिगंधा) या अन्न पदार्थाचा साठा विक्रीकरिता साठवलेला आढळला. हा साठा जप्त करुन दुकान मालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी दुकानचालक करण दशरथ शितळे याचेविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे कलम २६(२)(i), २६(२)(iv),३०(२)(a) सह  भा. दं. वि. कलम ३२८,१८८,२७२,२७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक आयुक्त, अकोला नितीन नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, प्रभाकर काळे यांनी ही कारवाई  केली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम