जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कारवाई;वाडेगाव येथे रोखला बालविवाह

 अकोला,दि.१२ (जिमाका)-  वाडेगाव येथे पातुर येथील एका अल्पवयीन मुलीचा रोखण्याची कारवाई जिल्हा बालसंरक्षण कक्षाने रविवारी (दि.११) केली, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बालसंरक्षण कक्षाला माहिती मिळाली की, वाडेगाव येथे पातुर येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रविवारी(दि.११) होऊ घातला आहे. या विवाहस्थळी एक तास आधीच बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी तेथे पोहोचले. बालिका १८ वर्षांपेक्षा कमी वयाची खात्री करुन तिच्या नातेवाईकांना बालविवाह अधिनियम २००६ अंतर्गत होणाऱ्या कारवाईबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीचा विवाह ती १८ वर्षांची पूर्ण होईस्तोवर करणार नाही असे लेखी हमी पत्र पालकांकडून घेण्यात आले व विवाह रोखण्यात आला. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, क्षेत्रीय कार्यकर्ता योगेंद्र खंडारे, वाडेगाव पोलीस चौकीचे हेडकॉन्स्टेबल  विनायक पवार, गणेश गावंडे हे या पथकात होते. या कारवाईत वाडेगाव सरपंच सुनिल घाटोळ, बाळापूर पोलीस स्टेशनचे दत्तात्रय अवाळे यांचे सहकार्य मिळाले. या कारवाईसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी मार्गदर्शन केले.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ