मुर्तिजापूर येथील गुलाम नबी आझाद गर्ल्स हायस्कूल येथे कायदे विषयक मार्गदर्शन



अकोला,दि. 9(जिमाका)-: महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने गुलाम नबी आझाद उर्दू गर्ल्स हायस्कूल ता.मुर्तिजापूर जि.अकोला येथे बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी शिक्षक व विद्यार्थ्यांना पॉक्सो कायदा, चाईल्ड लाईन 1098, बालकांचे हक्क, अधिकार व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

 जिल्हा बाल संरक्षण समितीच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पोक्सा कायदया बाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाम नबी आझाद उर्दू गर्ल्स हायस्कूल, ता. मुर्तीजापुर जि. अकोला येथे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे योगेंद्र खंडारे यांनी बालकांचे हक्क अधिकार कायदे बाबत विषयांची मांडणी करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक शाळेचे सहायक शिक्षक रिजवान अली जाफरी यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे संचालक राजीक अली नवाब फरहत उल्हाह खान, मुख्याध्यापिका फरहादिबा मॅडम,  शाळेमधील सर्व शिक्षक तथा कर्मचारी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ