कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘चार’ पॉझिटिव्ह;


अकोला दि.27(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 79 अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 4 व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4.

आरटीपीसीआर ‘चार’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक पुरुष व तीन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला महानगर क्षेत्रातील प्रत्येकी दोन प्रमाणे रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘15’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ