डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत पाच दिवसांचे निवासी मूलभूत प्रशिक्षण
अकोला,दि.2(जिमाका)- केंद्र
शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्यावतीने
जिल्ह्यातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, एफ.पी.सी. मुख्य अधिकारी व तज्ञ प्रशिक्षकांसाठी
वेदनंदीनी ॲग्रो टुरिझम, कान्हेरी सरप, अकोला येथे 5 ते 9 डिसेंबर 2022 पर्यंत निवासी मूलभूत प्रशिक्षण
आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या धर्तीवर वर्ष 2022-23 करिता केंद्र शासनाच्या
परंपरागत कृषि विकास योजनेची अंमबजावणी करण्याकरीता महाराष्ट्रात 500 गटांची स्थापना
करण्यात आली आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, एफ.पी.सी.
मुख्य अधिकारी व तज्ञ प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे उपसंचालक आरिफ शाह यांनी दिली.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा