ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा उपक्रम; चित्ररथाव्दारे ग्राहकांची जनजागृती


   अकोला,दि. 5 (जिमाका)-: जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वतीने ग्राहकांची जनजागृती व्हावी याकरीता चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला आज(दि.6) दुपारी 2 वाजता जिल्हा ग्राहक निवारण आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथून जिल्हा व सत्र न्यायधिश यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

            ग्राहक जागृती चित्ररथ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथून सिटी कोतवाली मार्गे शहरातील महत्वाच्या मार्गावर जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये बँक, विमा, पिक बियाणे, खते इत्यादी विषयाबाबत ग्राहकांची जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व ग्राहक, ग्राहक संस्था व या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिवक्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रबंधक सुनिल मराठे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना