राष्ट्रीय ग्राहक दिन; ग्राहकांनी जागृत राहून स्वत:च्या हक्कासाठी लढा-निवासी उपजिल्हाधिकारी












अकोला,दि.24(जिमाका)- कोणत्याही प्रकारची सेवा किंवा वस्तू घेतांना ग्राहकांनी  जागृत असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक, भ्रामक व आमिष दाखविण्याऱ्या जाहिरातीला बळी न पडता ग्राहकांनी जागृत राहून स्वत:च्या हक्कासाठी लढा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

            जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ निमित्त कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी बि.यु.काळे, सहायक पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष ॲड. एस.एम. उंटवाले, ग्राहक सरंक्षण संघाचे श्रीराम ठोसर, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष आर.डी. अहीर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण संस्थाचे संजय पाठक आदि उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, ग्राहकाचे सर्वोच्च हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा पारित केला आहे. कायद्यानुसार ग्राहकांना संरक्षण प्राप्त झाले असून त्याचा वापर ग्राहकांनी करावा.  ग्राहकांनी गुणवत्ता पूर्ण आयएसआय किंवा आयएसओ प्रमाणित वस्तूची खरेदी करावी. वस्तूंची गुणवत्ताचे पालन होत आहे याची खात्री ग्राहकांनी करावी, असे आवाहन संजय खडसे यांनी केले.   

 ॲड. एस.एम. उंटवाले यांनी ग्राहकांचे हक्क, सरंक्षण, हक्काविषयी तसेच शासनाने नवीन ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी, ग्राहकांच्या ऑनलाईन व जाहिरातीव्दारे होणाऱ्या फसवणूकीबाबतच्या तक्रारीचे निवारण कशा पद्धतीने करायच्या याबाबत मार्गदर्शन केले. कोणत्याही क्रेता ग्राहकांची फसवणूक होणार नाही झाल्यास अशासकीय सदस्य, संबंधित शासकीय कार्यालय व ग्राहक आयोगाकडे दादा मागू शकतो.  ग्राहकांनी वस्तु खरेदी करताना वस्तुवरील अटीशर्ती, सूचनाचे पालन करुनच खरेदी करा, तरीही फसवणूक होत असल्यास ग्राहक आयोगाकडे दाद अवश्य मागा, असे आवाहन ॲड. एस.एम. उंटवाले त्यांनी यावेळी केले. तसेच ग्राहकांव्दारे केलेल्या तक्रारीचे वेगाने निराकरण होत आहे. विविध माध्यमाव्दारे ग्राहकांची जनजागृती करुन ग्राहकांचे प्रबोधन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 ग्राहक सरंक्षण संघाचे श्रीराम ठोसर, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष आर.डी. अहीर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण संस्थाचे संजय पाठक यांनी ग्राहकांची होणारी फसवणूक व त्यावर करावयाची कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. ग्राहकांच्या रक्षणासाठी व त्यांच्या तक्रारीचे निरासरण करण्यासाठी स्वयंसेवी संस्था सदैव तत्पर असल्याचे त्यांनी संबोधनात सांगितले.  

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनजागृती लोकनाट्य मंडळ संस्थाचे शाहिर खंडूजी सिरसाट व त्यांच्या चमूनी ‘जागो ग्राहक जागो’ लोकगीतव्दारे जनजागृती केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शासकीय व खाजगी उत्पादीत वस्तूचे स्टॉल प्रदर्शनी लावून ग्राहकांचे वस्तू व सेवा घेतांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.  जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी प्रास्ताविकमध्ये ग्राहकाचे हक्क व अधिकार याबाबत माहिती दिली. तर सुत्र संचालन चेतना माहूरे यांनी तर आभार प्रदर्शन तुषार चिंचोले यांनी केले.  

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ