‍जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये वैष्णवी धंदरेचा प्रथम क्रमांक



अकोला,दि.17(जिमाका)-  अनुसूचित जाती मुलींची शासकिय निवासी शाळा, गोरेंगांव खुर्द येथील विद्यार्थी कु. वैष्ण़वी धंदरे यांनी 14 वर्षाखालील जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्ध़ेमध्ये प्रथम क्रमांक पटकविला.

 येथील वसंत देसाई क्रिडा संकुलाच्या मैदानावर ‍जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये गुरुवारी दि.15 डिसेंबर रोजी अनुसूचित जाती  मुलींची शासकिय निवासी शाळेतील वर्ग आठवीची विद्यार्थींनीने 100 मी व 200 मी. धावणे स्पर्धेंत प्रथम क्रमांकमिळवला तर लांब उडी स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवून एकाच खेळाडूने तीन पदके  मिळवले. या  कामगिरीकरीता ‍क्रिडा विभागामार्फत कु. वैष्ण़वी धंदरे यांना उत्कृष्ट  खेळाडू म्ह़णून गौरविण्यात आले. तिच्या उल्लेखनिय कागगिरीचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ