राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम: २८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता; पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन पथक मुंबईकडे

 




                  अकोला,दि. ८ (जिमाका)-राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत बालकांच्या आरोग्याची तपासणी व तपासणी निदानानंतर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. या अंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक निदानानंतर ७६ बालकांची तपासणी हृदय संबंधिता आजारांसाठी करण्यात आली. त्यात २८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता शस्त्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन आज जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे पथक मुंबई येथे रवाना झाले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून विशेष बसने हे पथक बालकांना घेऊन रवाना झाले. बालकांसमवेत त्यांचे पालकही असणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना हाढोळे तसेच अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.

 राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात शाळा तपासणीत हृदयरोगाशी संबंधित जटीलतेची लक्षणे  दिसून आलेल्या ७६ बालकांची दि.१६ ऑक्टोबर रोजी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात टु डी इको चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी डॉ. भुषण चव्हाण हे तज्ज्ञ उपस्थित होते. या तपासणीअंती २८ बालकांना हृदयशस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे निदान करण्यात आले.  यापैकी पहिल्या टप्प्यात ११ बालकांना आज रवाना करण्यात आले.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देश बालकांच्या आरोग्य तपासणी करुन त्यांच्यातील आजारांचा लवकर शोध घेऊन निदान करणे व लवकर उपचार करुन आजारापासून बालकांना मुक्तता देऊन त्याचे पुढील आयुष्य निरोगी होण्यासाठी प्रयत्न करणे असा आहे. त्यासाठी सर्व तपासण्या, चाचण्या, उपचार आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया इ. सर्व खर्च आरोग्य विभागामार्फत केला जातो.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ