ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; उमेदवरांना 2 डिसेंबरच्या सायंकाळपर्यंत दाखल करता येईल नामनिर्देशन



अकोला,दि. 1(जिमाका)-:  जिल्ह्यात होवू घातलेल्या सात तालुक्यातील 266 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत  उमेदवरांना पारंपारिक पद्धतीने नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे .

                जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीव्दारे  शुक्रवार दि. 2 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत, देण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी याकरीता पारंपारिक पद्धतीने दि. 2 डिसेंबर रोजी सायं 5.30 वाजेपर्यंत मुदत वाढविण्याचे  निर्देश आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी दिले आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना