एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशाकरिता अर्ज आमंत्रित



अकोला,दि.29(जिमाका)- आदिवासी विकास विभागांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसीडेशियल स्कुलमध्ये प्रवेशासाठी दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याकरीता दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले आहे.

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील जिल्हातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालीका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील. सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडे सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधीत शासकीय, अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या वार्षिक उत्पन्नाचा तसेच पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवेदन पत्रासोबत जोडणे आवश्यक राहिल.

 

परिक्षेचे ठिकाण व वेळ

शासकीय आश्रमशाळा, कोथळी ता. बार्शिटाकळी जि.अकोला, शासकीय आश्रमशाळा, घाटबोरी ता.मेहकर जि. बुलडाणा येथे दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी इयत्ता सहावी करिता सकाळी 11 ते 1 या वेळेत तर इयत्ता सातवी ते नऊवी करिता सकाळी 11 ते 2 या वेळेत घेण्यात येईल.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ