ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; मतदानासाठी यंत्रणेची सज्जता; मतदारांनी आपला हक्क बजवावा


 अकोला दि.17(जिमाका)-  जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

घोषित कार्यक्रमानुसार रविवार दि.१८ रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० (अखंड) राहिल.

जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात ६२ पैकी २३, अकोट-८४ पैकी 36, मुर्तिजापूर-८६ पैकी ५१, अकोला- ९७ पैकी ५४, बाळापूर ६६ पैकी २६, बार्शी टाकळी- ८० पैकी ४७, पातूर- ५७ पैकी २८ अशा एकूण ५३२ पैकी २६५ ग्रामपंचायतीमध्ये मतदान होणार आहे. तर धामणगाव ता. अकोट ही एकमेव ग्रामपंचायत संपूर्ण अविरोध(सरपंच व सदस्य) झाली आहे. सरपंचपदासाठी २५८ जागांसाठी  ९३६ निवडणूक लढणारे उमेदवार रिंगणात आहेत. तर  ग्रामपंचायत सदस्यांकरीता १५२० पदासाठी ३८६७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणूकीत एकूण ३ लाख ७ हजार ६४०  मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत निवडणूक कार्यालयाव्दारे देण्यात आली आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ