ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार बंद

अकोला, दि.17(जिमाका)-  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत मतदार संघात रविवार दि. 18 रोजी मतदान तर मंगळवार दि.20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने मार्केट अॅन्‍ड फेअर अॅक्‍ट 1962 चे कलम 5 च्या तरतूदीनुसार जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत मतदारसंघात मतदानाच्‍या दिवशी रविवार दि. 18 रोजी  व मतमोजणी मंगळवार दि.20 डिसेंबर रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहे. तसेच नमुद तारखेस त्‍या ठिकाणांचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरविण्‍यात यावे, असेही आदेशाव्दारे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा