एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध -महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अकोला , दि . 2 9 ( जिमाका )- समाजातील विधवा, परिपक्वता व एकल महिलासाठी शासनाच्या विविध योजना आहे. एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. जिल्हा परिषद कर्मचारी सभागृहात आयोजीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियासोबत संवाद साधण्यासाठी आयोजीत संवाद मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत, सेवानियुक्त उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार नातेकोद्दीन खतीब, हिदायत पटेल, विजय अभोरे, बबनराव चौधरी, देवानंद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना धीर देतांना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आयुष्यात आलेले दु:ख धुणे धुण्यासारखे धुवून टाकावे, पिळून टाकावे, झटकून टाकावे व पुन्हा उमेदीने उभे राहावे, संकटाला सामोरे जावे अशा शब्दात त्यांनी धिर दिला. विचारांची व कार्याची भुक लागली पाहिजे तर सर्व संकटे आत्म सन्मानाने दुर होतील शासनाला आत्महत्याग्रस्त ...