हवामान अंदाजःविजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता


अकोला,दि.25(जिमाका)- भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 28 जुलैपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सततच्या पाऊसामुळे दगडपारवा प्रकल्पामध्ये 81.5 टक्के पाणी साठा असुन या प्रकल्पामध्ये मोठया प्रमाणावर पाणी साठा जमा होत आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोर्णा नदीमध्ये 2.27 क्यू मेक करण्यात येत आहे.  त्याअनुषंगाने नदी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयात हजर राहावे.

 नदी नाला काठावरील गावांना पुराचा प्रभाव असलेल्या वस्तींना सतर्कतेच्या सुचना देण्यात येत आहे. तसेच नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायाब तहसिलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ