जि.प. व प.स.निवडणुक; दि.16 रोजी उपसभापती निवड: पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
अकोला, दि.7(जिमाका)- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्ह्यातील
सात पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या उर्वरित अडीच वर्षाच्या कालावधीकरीता शनिवार
दि. 16 जुलै रोजी दुपारी तीन वाजता सभा आयोजीत केली आहे. या सात पंचायत समितीच्या
उपसभापती निवडणूकीसाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा
यांनी निर्गमित केले आहे.
आदेशात म्हटल्याप्रमाणे उपसभापती निवडणूकीकरीता
पिठासीन अधिकारी याप्रमाणे: तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी
व पातूर पंचायत समितीकरीता संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांची नियुक्त केली आहे. संबधीत
पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समितीच्या आयोजीत सभेत उपसभापती पदाच्या निवडणूक
होईल. अध्यासी अधिकारी यांनी उपसभापती यांच्या निवडणूक संदर्भात महाराष्ट्र
जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा(अध्यक्ष, उपाध्यक्ष विशेष समित्यांचे
सभापती) आणि पंचायत समित्या(सभापती व उपसभापती पदाचे आरक्षण व
निवडणूक) नियम, 1962 च्या तरतुदीनुसार
पंचायत समिती उपसभापती निवडणूक पुर्ण केल्या जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा