जिल्हा उद्योग मित्र समिती बैठक :औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे मार्गी लावा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

 






           अकोला,दि.१४(जिमाका)- येथील औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत आज  विविध विषयाचा आढावा घेण्यात आला.

            जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, अमरावती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दिंगबर पारधी, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर अमृतीकर, सहायक अभियंता धिरज नगरोल, पोलीस निरीक्षक एन.एस. शिंदे, राज्य कर्मचारी विमा संघटने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती कराळे, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण उपव्यवस्थापक श्रीकांत ढगे, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे सचिव नितीन बियाणी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निलेश गुप्ता, उपाध्यक्ष आशिष चंद्र, सचिव निरव वर्मा, तसेच विविध विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

                 जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या उद्योगांना येणाऱ्या विविध समस्या या बैठकीत मांडण्यात आल्या. एमआयडीसी येथील रस्ते दुरुस्ती, रस्तालगत असलेले मासविक्री केंद्राचे अतिक्रमण, सिसीटीव्ही लावणे, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करणे, अतिक्रमणामुळे होणारे अपघात, औद्योगिक परिसरात सुलभ शौचालय, कामगारांना वैद्यकीय सुविधा या मुद्यांचा समावेश होता. संबंधित यंत्रणांनी या समस्या तातडीने मार्गी लावाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. एमआयडीसीचे ऑनलाईन सेवा व डीसी रुलबाबतची माहिती उद्योजकांना होण्याकरीता सेमिनारचे आयोजन करा. तसेच उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासकीयस्तरावर पाठपुरावा करुन तातडीने मार्गी लावावे,असेही निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ