कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह तर एकास डिस्चार्ज

   अकोला दि.१९(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ९१अहवाल प्राप्त झाले. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला,  तर एकास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. ५ व खाजगी ०)५+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह ५.

आरटीपीसीआर ‘पाच’

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात चार महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एकास डिस्चार्ज

आज दिवसभरात एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘१४७’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५६१४ (४९५२१+१५१०२+९९१) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४७ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ