प्‍लास्‍टर ऑफ पॅरीस मुर्तींची निर्मीती व विक्रीस अटीशर्तीसह परवानगी; जिल्हाधिकारी यांचे आदेश


अकोला दि.22(जिमाका)-  केन्‍द्रीय प्रदुषण नियंत्रण  मंडळाचे दि. 20 मे च्या अधिसूचनेनुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्‍यासाठी प्‍लॉस्‍टर ऑफ पॅरीसच्या वापरास प्रतिबंध करण्यात आले होते. परंतु  पर्यावरण समितीच्या बैठकीत 2022 वर्षाकरीता गणेश उत्‍सव दरम्‍यान प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसच्‍या मुर्तींची निर्मीती व  विक्री करण्‍यास अटीशर्तीसह परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात म्हटल्याप्रमाणे :  

१.      सन 2022 या वर्षाकरिता श्री गणेश यांच्‍या प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसच्‍या मुर्तींची  निर्मीती, वितरण,  विक्री आणि खरेदी करण्‍यास दंडात्‍मक कार्यवाहीसह अटी व शर्तीचे अधीन राहून  सवलत  देण्‍यात येत आहे.

अ)   मुर्ति बनविणाऱ्या निर्मात्‍यांनी  धर्मदाय आयुक्‍त अथवा महानगरपालिका अकोला व संबंधीत नगर परिषद किंवा नगर पंचायत  येथे नोंदणी करणे बंधनकारक राहील.

आ) एकूण निर्मीती केलेल्‍या व विक्रीसाठी पीओपीच्‍या प्रतीमूर्तीवर दंडाची रक्‍कम म्‍हणून रक्‍कम 50 रुपये  भरणा करणे अनिवार्य राहील.  या बाबतची कार्यवाही मनपा आयुक्‍त, संबंधीत नगर परिषद व नगर पंचायत, प्रदुषण नियंत्रण मंडळ, गाडगेबाबा प्रतिष्‍ठाण व महसूल विभाग यांनी आवश्‍यक पथकाचे गठण करुन  करावी.

इ)      मुर्तिकार यांना मुर्ती निर्मीती व विक्रीची सवलत केवळ सन 2022 करिता देण्‍यात येत असल्‍यामुळे,  संबंधीत मुर्तिकार यांनी विहित नमून्‍यात प्रतिज्ञालेखासह घोषणापत्र महानगरपालिका, संबंधीत नगर परिषद व नगर पंचायत या ठिकाणी  सादर करणे बंधनकारक राहील.

२.      सादर केलेल्‍या घोषणापत्राची तपासणी महानगर पालिका, अकोला शहरी व ग्रामीणभागाकरिता संबंधीत नगर परिषद व नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी करेल.  

३.       एकूण विक्रीसाठी उपलब्‍ध असलेल्‍या पीओपीच्‍या मुर्तिंवर ठळपणे पीओपी- 2022 असे मुद्रांकित करणे बंधनकारक राहील.

४.      नमूद केलेल्‍या अटी व शर्तीचे  उल्‍लंघन  केल्‍यास संबंधीत व्‍यक्‍ती  नियमानुसार कारवाईस पात्र राहील.

५.      महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये आयुक्‍त महानगर पालिका, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, महसूल विभाग तसेच जिल्‍ह्यातील इतर शहरी भागामध्‍ये मुख्‍याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत,  स्‍थानिक पोलीस व महसूल प्रशासन  यांनी संयुक्‍त पथकाचे गठण करुन आदेशाचे उल्‍लंघन करणाऱ्या व्‍यक्‍ती वा प्रतिष्‍ठाणांवर नियमानुसार  कारवाई करावी.

६.      ग्रामीण भागामध्‍ये मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशाचे पालन होण्‍याचे दृष्‍टीने आवश्‍यक ते नियोजन करुन उचित  कार्यवाही करावी.

७.       आदेशाची यथोचित अंमलबजावणी होण्‍याचे दृष्‍टीने  प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ अकोला यांनी त्‍यांचे अधिनस्‍त अधिकारी व कर्मचारी यांचे स्‍वतंत्र आदेश निर्गमित करेल.

८.       संबंधीत तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी  त्‍यांचे कार्यक्षेत्रामध्‍ये  आदेशाची अंमलबजावधी होण्‍याचे दृष्‍टीने आवश्यक ते नियोजन करेल.

0000000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ