स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव;‘महावितरण’चा उपक्रम ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव आज (दि.२९)

 


अकोला दि.२८(जिमाका)-   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि.२९ रोजी ‘महावितरण’तर्फे करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता व सायंकाळी ५ वा. असे दोन कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. पहिला कार्यक्रम अकोला येथे सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे होणार असून  दुसरा कार्यक्रम सायंकाळी पाच वा. श्रद्धासागर सभागृह, दर्यापूर रोड, अकोट येथे होणार आहे, या कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, लोकसभा सदस्य खा. संजय धोत्रे, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. अमोल मिटकरी, ॲड, किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख या मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.  तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, महावितरणचे प्र. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांचीही उपस्थिती राहणार आहे. दुसरा कार्यक्रम सायंकाळी पाच वा. श्रद्धासागर सभागृह, दर्यापूर रोड, अकोट येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन  पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे नोडल ऑफिसर दीपक जैन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, महावितरण अकोला चे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ