इयत्ता ११ वी प्रवेश क्षमता निश्चिती; हरकती आक्षेप मागविले

            अकोला,दि.१४(जिमाका)- संपूर्ण राज्यात कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता ११ वी प्रवेशाच्या क्षमता निश्चितीचा कार्यक्रम सुरु आहे. जिल्ह्यातही हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागामार्फत  जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. तेथील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा तपासून  प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. ही प्रवेश क्षमता घोषितही करण्यात आली आहे. याबाबत कोणास आक्षेप वा हरकती असल्यास पुराव्यासह सादर करावे, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. सुचिता पाटेकर यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ