राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आगमन व स्वागत







अकोला, दि.७(जिमाका)- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अकोला येथे आगमन झाले. यावेळी जिल्हाप्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे समवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही स्वागत करण्यात आले.

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६व्या दीक्षांत समारंभासाठी दोन्ही मान्यवरांचे आज शिवनी विमानतळ येथे आगमन झाले. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे तसेच अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आदी उपस्थित होते.

त्यानंतर मान्यवर दीक्षांत समारंभाकडे रवाना झाले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन