पत्रकार; माध्यमकर्मींसाठी कोविड लसीकरणाचे विशेष सत्र; आरोग्य विषयक जनजागृतीत पत्रकारांची भुमिका मोलाची - निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे








अकोला दि. 23(जिमाका)- बातम्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध घटना घडामोडी पोहोचविणाऱ्या पत्रकारांनी आरोग्य विषयक जनजागृतीत मोलाची भुमिका बजावली;याचा प्रत्यय कोविडच्या  काळात समाजाच्या सर्व घटकांना आला आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज येथे केले.

कोविड लसीकरणासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही सभागृहात पत्रकार व माध्यमकर्मी तसेच त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी कोविड लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात 126 जणांनी लसीकरण करुन घेतले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला व एम. आरआयटीई प्रकल्पासाठी वायजीआर केअर यांच्या समन्वयातून करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, सिद्धार्थ शर्मा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे, बहुजन पत्रकार संघाचे पुरुषोत्तम आवारे, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर, मधु जाधव, विशाल बोरे, अनिल माहोरे, लसीकरण समन्वयक डॉ, मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी,  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती सहायक सतिश बगमारे आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, जिल्ह्यातील पत्रकारांनी आरोग्य विषयक जनजागृतीत महत्त्वाची भुमिक बजावली आहे. त्यांचेही आरोग्य उत्तम रहावे, त्यांचाही कोविड संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार संघाचे सिद्धार्थ शर्मा यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व जनहिताच्या कोणत्याही विषयासाठी अकोला जिल्ह्यातील पत्रकार नेहमीच तत्पर असून प्रशासनास सहकार्य करत असतात, असे सांगितले. पुरुषोत्तम आवारे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, पत्रकारांचे आरोग्य चांगले राखणे, त्यांनीही सुदृढ रहावे यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी स्वागत केले. डॉ. मनिष शर्मा यांनी जिल्ह्यातील कोविड लसीकरणाची सद्यस्थिती व त्यासाठी प्रशासनातर्फे होत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

या लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनम कौसर, परिचारीका मार्था गाडे, सुनिता राठोड, अर्चना ठोसरे, बबिता इंगळे, आशावर्कर  विद्या कटनकर व रेखा बनकर, वायजीआर केअर चे जिल्हा कार्यक्रम समन्वयक मोहसिन मनियार व जिल्हा माहिती कार्यालयाचे कॅमेरामन हबीब शेख, लिपीक विश्वनाथ मेरकर, गजानन इंगोले, मंदार कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ