हवामान अंदाजःविजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
अकोला,दि.23(जिमाका)- भारतीय हवामान विभाग यांच्याकडून
प्राप्त संदेशानुसार दि. 24 जुलैपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील
सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले,
तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये.
रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच
स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे सूचना जिल्हाधिकारी
कार्यालयाचे नायाब तहसिलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा