प्राणीजन्य रोगांबाबत लोकांनी सजग राहणे ही काळाची गरज - डॉ धनंजय दिघे
अकोला, दि.7(जिमाका)- निसर्गात मानवाचे अस्तित्व पशुपक्षी आणि वनस्पती यांच्या
सहचर्यातून उभे राहिले आहे. म्हणून परस्परांच्या एकमेकांच्या सहवासात नांदताना
आरोग्यावर परिणाम होतो. जवळपास 70 टक्के रोग हे प्राण्यांपासून माणसांना होत
असल्याने अशा प्राणीजन्य रोगांवर प्रतिबंधक उपाययोजना करणे काळाची गरज असल्याचे मत
सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी व्यक्त केले.
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान
संस्था अकोला येथे जागतिक प्राणीजन्यरोग दिनाच्या निमित्ताने आयोजित
चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. “प्राण्यांपासून माणसांना होणारे
रोग" या विषयावरील परिसंवादात सूक्ष्मजीवशास्त्र
विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूजाश्री शर्मा यांनी “प्राण्यांपासून माणसांना
होणारे रोग” या विषयावर तर सूक्ष्मजीवशात्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
सहाय्यक प्राध्यापक डॉ. नाजणीन मालक यांनी “प्रतिजैवकांचा प्रतिकार : मानवी
आणि प्राण्यांच्या आरोग्यास जोड” या विषयावर संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक
तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्रमुख वक्ते म्हणून विस्तृत असे मार्गदर्शन
केले. परिसंवादाचे प्रास्ताविक पशुविकृती
शास्त्र, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थाचे विभाग प्रमुख डॉ. रणजीत इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.
भुपेश कामडी यांनी केले तर डॉ. महेश इंगवले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम
यशस्वीरीत्या पार पडण्याकरिता संस्थेचे अधिकारी डॉ. सुनील वाघमारे, डॉ. किशोर पजई,
डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000
.jpeg)
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा